विक्रोळी येथे सुप्रभात महिला मंडळात जागतिक महिला दिन साजरा

 विक्रोळी येथे सुप्रभात महिला मंडळात जागतिक महिला दिन साजरा

मुंबई, दि १२: विक्रोळी कन्नमवार नगरातील सुप्रभात महिला मंडळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी महिलांच्या समस्यांबाबत इंडियन मेडीकल असोशिएशन एनईबीएसच्या वतीने विशेष वैद्यकीय शिबीर घेण्यात आले.
डॉ.सोनल परेलकर(सर्जन), डॉ. मधुश्री वेंकट,गायनॅकॉलॉजिस्ट
यांनी महिलांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या.डाॅ.मधुश्री वेंकट यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत व इतर समस्यांबाबत महिलांना मार्गदर्शन केले. डाॅ.सोनल परेलकर यांनी महिलांनी आपली स्वच्छता कशी ठेवावी तसेच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यावर महिलांनी आपले विविध प्रश्न डॉक्टर परळीकर यांना विचारल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर पडळकर यांनी अगदी दिलखुलासपणे दिली. तसेच काही महिलांनी शस्त्रक्रिये बाबत प्रश्न विचारल्यावर त्याची देखील उत्तरे त्यांनी योग्य पद्धतीने दिली. या सर्व प्रश्नांची उत्तरावर महिलांनी समाधान व्यक्त केले..कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडीकल असोशिएशन एनईबीएसचे अध्यक्ष हरिशचंद्र पांचाळ व विक्रोळीतील सेवाभावी डाॅ.जयश्री पांचाळ, मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा
कल्याणकर,सेक्रेटरी आसावरी भोईटे, खजिनदार प्राची रेडकर प्रतिभा धुंदुर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *