इराणच्या 5 महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियात आश्रय

 इराणच्या 5 महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियात आश्रय

मेलबर्न, दि. १० : आशियाई कपमधून बाहेर पडल्यानंतर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी व्हिसा देऊन आपल्या देशात राहण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या संघाने आपले राष्ट्रगीत गायले नव्हते. यानंतर त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी गोल्ड कोस्ट स्टेडियमबाहेर शेकडो लोकांनी संघाच्या समर्थनार्थ “सेव्ह अवर गर्ल्स” च्या घोषणा दिल्या आणि खेळाडूंना सुरक्षित ठेवण्याची मागणी केली.

इराण आणि साऊथ कोरिया (Iran VS South Korea) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यापूर्वी इराणच्या राष्ट्रीय महिला संघाने त्यांच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी सायलेंट प्रोटेस्ट केला. गोल्ड कोस्टच्या सीबस सुपर स्टेडियममध्ये सामन्यापूर्वी इराणचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं होतं. मात्र यादरम्यान खेळाडू आणि इतर स्टाफने सामन्यापूर्वी देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *