एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी साक्षी दळवी

 एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी साक्षी दळवी

मुंबई, दि ९
एस आणि ‘टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती साक्षी दळवी या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. सुरेश शिंदे यांना ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली.

‘एस आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी कामकाज सांभाळले.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. संतोषकुमार धोंडे, एस विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद, टी विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *