काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

 काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

मुंबई, दि. ८ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंटला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टॅलेंट हंट अभियानांतर्गत नाव नोंदणी केल्यानंतर आज प्रत्यक्ष विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. राज्यातील सर्व विभागात या मुलाखती घेण्यात आल्या. या अभियानामधून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधान, लोकशाही रक्षणाचे काम करण्याची संधी मिळणार आहे.

काँग्रेस पक्षासाठी काम करु इच्छिणाऱ्या विविध क्षेत्रातील तज्ञांना काँग्रेस पक्ष एक व्यासपीठ मिळवून देणार आहे, त्यासाठी देशभर हे प्रतिक्षा शोध (टॅलेंट हंट) अभियान सुरु करण्यात आले आहे. कोकण विभागातील ८० इच्छुकांनी अर्ज केले होते.

या अभियानांतर्गत फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले, त्यानंतर या अर्जांची छाननी करून आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार, समाजातील तज्ञ लोकांच्या समितीने प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, यातुन अंतिम निवड करण्यात येणार आहे.

कोकण विभागातील मुलाखती प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन पार पडल्या. यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रद्धा ठाकूर, वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत, काँग्रेस पक्षाचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *