९,१११ महिलांनी सादर केले लेझीम नृत्य, रचला विश्वविक्रम
ठाणे दि ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित भव्य कार्यक्रमात ९,१११ महिला आणि विद्यार्थिनींनी एकत्रितपणे लेझीम नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम रचला. या अनोख्या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात १० हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. सुमारे साडेपाच मिनिटे एकत्रितपणे लेझीम आणि व्यायाम सादर करण्यात आला. यापूर्वी हा विक्रम सांगलीच्या नावावर होता, जिथे ७,३३८ महिलांनी लेझीम नृत्य सादर केले होते. कार्यक्रमानंतर अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रे देऊन नवीन विश्वविक्रमाची घोषणा केली. आयोजकांनी याला महिला शक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अभिमानास्पद क्षण म्हटले.ML/ML/MS