के एस बी लिमिटेड कडून २०२५ वर्षात उल्लेखनीय विक्री वाढ; २२० टक्के लाभांश जाहीर
पुणे, दि ३: के एस बी लिमिटेड ने २०२५ या वर्षात एकूण २,६९६ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवून मागील वर्षाच्या तुलनेत ६.४२ टक्के वाढ साध्य केली आहे. चौथ्या तिमाहीत ७८४ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदले गेले असून, त्यात ७.९३ टक्के वाढ झाली आहे.
वर्षभरातील करपूर्व नफा ३५२.६ कोटी रुपये इतका झाला असून, नफ्यात सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे. संचालक मंडळाने २२० टक्के लाभांश जाहीर केला आहे.
सौर पंपांसाठी विविध शासकीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागण्या प्राप्त झाल्या आहेत. तसेच अल्जेरिया येथील रिफायनरी प्रकल्प, संयुक्त अरब अमिरात येथील पाणी क्षेत्र, द्रवरूप पेट्रोलियम वायू साठवण प्रकल्प आणि छत्तीसगड येथील वीज प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण मागण्या मिळाल्या आहेत.
संतुलित उत्पादन रचना आणि वाढती निर्यात उपस्थिती यांच्या बळावर आगामी काळातही स्थिर वाढ कायम राहील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.KK/ML/MS