भाजपा बेस्ट कामगार संघाने केला नवनियुक्त ‘बेस्ट’ समिती सदस्यांचा जाहीर सत्कार.

 भाजपा बेस्ट कामगार संघाने केला नवनियुक्त ‘बेस्ट’ समिती सदस्यांचा जाहीर सत्कार.

मुंबई, दि ३

मुंबई महानगरपालिकेच्या ‘बेस्ट’ उपक्रमावर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर ‘बेस्ट’ समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक व मंगलमयी क्षणाचे औचित्य साधून, भाजपा बेस्ट कामगार संघ व भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई यांच्या वतीने नवनिर्वाचित बेस्ट सदस्यांचा जाहीर सत्कार सोहळा नुकताच दादर येथील ‘वसंत स्मृती’ भाजपा मुंबई कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यात
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
म्हणून भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि भाजपा कामगार मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश) सरचिटणीस श्री. हनुमान अण्णा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गौरवमूर्ती सत्कारार्थी
बेस्ट समितीवर निवड झालेल्या
सुनील गणाचार्य साहेब (कार्याध्यक्ष – भाजपा बेस्ट कामगार संघ व संयोजक – मुंबई भाजपा कामगार आघाडी), रमाकांत गुप्ता, संतोष मेडेकर,प्रमोद वाकोळे,आकाशजी राजपुरोहित, अजय सिंह यांचा खास सत्कार करण्यात आला. “गेल्या ३-४ वर्षांपासून प्रशासकीय कारभारामुळे कामगारांचे अपरिमित नुकसान झाले आहे. बेस्टचे मुंबई महानगरपालिकेत विलीनीकरण, प्रलंबित आर्थिक करार आणि ताफ्यातील बसेसची घटती संख्या हे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत. आता आपले हक्काचे प्रतिनिधी समितीवर नियुक्त झाल्याने हे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असा आम्हाला ठाम विश्वास असल्याची माहिती बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी दिली.
“कामगारांची पगारवाढ, थकीत देणी, ग्रॅच्युइटी, मेडिक्लेम आणि आरोग्य सुविधा या बाबींना आम्ही प्राधान्य देऊ अशी माहिती सत्कारमूर्ती बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.
तसेच, अध्यक्ष श्री. गणेश हाके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मुंबईत आता भाजपाची सत्ता असून बेस्ट समितीमध्ये आपले बहुमत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि कामगारांचे हित जोपासण्याचे काम आता युद्धपातळीवर केले जाईल. गेले अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित राहिले, ते सोडवण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे.”
कृतज्ञता आणि जाहीर आभार
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी, भाजपा बेस्ट कामगार संघ आणि भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई यांच्या वतीने उपस्थित सर्व कामगार बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आता एक सक्षम फळी सज्ज झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काटकर आणि
आभार प्रदर्शन झुंबर जाधव यांनी केले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *