सावर्डेमध्ये होल्ट्या शिमग्याची अनोखी प्रथा….
रत्नागिरी दि ३ : चिपळूण तालुक्यातील सावर्डेमध्ये शिमगोत्सवात एक अनोखी प्रथा जपली जाते. इथं चक्क पेटते निखारे एकमेकांवर फेकले जातात. यालाच होल्टा शिमगा असे म्हणतात. या खेळात गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहतात, लाकडं पेटवतात. ढोल ताश्यांच्या गजरात आरोळ्या ठोकतात आणि सुमारे तीन फुटांच्या अंतरावरून पेटती लाकडं तीन फेरीत तीन वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही जळकी लाकडं अंगावर पडून कोणीही जखमी होत नाही किंवा कोणी भाजतही नाही ही इथली आश्चर्याची गोष्ट आहे. शेवटी ही जळकी लाकडं एकत्र करून याची होळी केली जाते. हा अनोखा होल्ट्या शिमगा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.ML/ML/MS