मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत

 मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत

मुंबई,दि. 13 : जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळा (School) अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसेनं (MNS) याची दखल घेत शाळेत धाव घेतली आहे.

मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, सिटी इंटरनॅशनल स्कूल नावाने मागील 25 वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे 35 लाख रुपयांच्या जागेवर आता 50 लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *