राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध, भाजपा आघाडीवर
मुंबई दि २ : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीतील एकूण २८६९ जागांपैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, यातील ६४ महायुतीचे उमेदवार आहेत.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने किंवा त्यांचे अर्ज अवैध ठरल्याने 65 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यातील 64 उमेदवार हे महायुतीचे आहेत यातील 44 भाजपाचे 18 शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तर एक मालेगाव मधील इस्लामी पक्षाचा उमेदवार आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणूकी मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये जयश्री रवींद्र फाटक, सुखदा संजय मोरे, राम रेपाळे, एकता भोईर आणि शीतल ढमाले यांचा समावेश आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदे यांच्यासह एकूण शिवसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
कल्याण डोंबिवली
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे १४ तर शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानं तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानं एकूण १२२ पैकी सेना भाजपा युती प्रत्यक्ष मतदानापूर्वीच वीस ठिकाणी बिनविरोध निवडून आली आहे. बहुमताचा आकडा ६३ इतका आहे.
भिवंडी
भिवंडी निजामपूर महापालिकेतून भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काल सुमित पाटील बिनविरोध निवडून आले होते त्यात आज आणखी तिघांची भर पडली, दीपा मढवी , अश्विनी फुटाणकर आणि राजू चौगुले असे तिघे आणि अन्य दोघेजण आज बिनविरोध ठरले आहेत.ML/ML/MS