मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एक साथ !
मुंबई दि २८ : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.
या युतीअंतर्गत जागावाटपाचाही प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असून, उर्वरित जागांवर काँग्रेस आणि युतीतील इतर घटक पक्ष निवडणूक लढवतील.ML/ML/MS