*रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप
मुंबई, दि २५
सामाजिक दायित्व प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांचा वाढदिवस एन एस डी अंध समूह गृह, कॉटन ग्रीन येथील अंध व्यक्तींना ब्लँकेट, बिस्किट पाणी,वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी अंध व्यक्तींनी त्यांना दिलेल्या विविध वस्तू बाबत विविध मान्यवरांचे आभार व्यक्त केले. आम्ही अंंदाज असून देखी मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे चांगल्या भावनेने पाहतो तसेच आम्हाला काही ना काही मदत करतो ही भावना आम्हाला फार लढण्याचे बळ देते. या प्रेरणेतूनच आम्ही पुढे वाटचाल करत असतो अशी माहिती मिलिंद काळे या अंध व्यक्तीने या कार्यक्रमात आभार प्रकट करताना दिली.
समाजातील अंध व्यक्तींना आपल्या पायावर उभे राहावे आणि त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे या हेतूने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी देखील आम्ही आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त याच ठिकाणी या अंध व्यक्तींसाठी विविध लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारचा कार्यक्रम दर महिन्यात करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक विशाल गायकवाड आणि सामाजिक दायित्व प्रतिष्ठानचे संस्थापक शिरीष भाई चिखलकर यांनी दिली.KK/ML/MS