आनंदराज आंबेडकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई, दि २५
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्यासहित या महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲड. अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS