करी रोड येथे तुटलेल्या गटारामुळे अपघातात वाढ
मुंबई, दि २४
करी रोड येथील लाडू सम्राट हॉटेल समोरील रस्त्यावर गटाराचे झाकण तुटलेले असल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हे तुटलेले गटाराचे झाकण रस्त्यांच्या कडेला असून ते शक्यतो रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे चारचाकी , दुचाकी वाहनचालकांचा या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून टायर गटारात अडकत आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर गर्दीच्या वेळेस वाहतूक जास्त असताना येथे रोज अपघात घडत आहे. तर हे गटाराचे झाकण पूर्णपणे रस्त्यावरून खाली गेले असून एका बाजूला कलंडले आहे. त्यामुळे वाहनाचे चाक या झाकणावर पडताच हे झाकण चाकात अडकून अपघात होत आहे. हे गटार मुख्य रस्त्यावर असल्यामुळे येथे रस्ता ओलांडण्यासाठी वाहनाची, पादचाऱ्यांची आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या गटारात अनेक पादचारी, चाकरमानी, महापालिका कर्मचारी आणि विद्यार्थी पाय अडकून पडत आहे. चार चाकी, सायकलस्वार आणि दुचाकी वाहनांना देखील हे तुटलेले गटाराचे झाकण दिसत नसल्यामुळे गाडीचे चाक या गटारात अडकून टायर फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी देखील महापालिका प्रशासनाने आजून या झाकणाच्या दुरुस्ती केलेली नाही. तरी त्वरित या गटाराच्या झाकणाच्या दुरुस्तीकरून नवीन गटाराचे झाकण याठिकाणी बसवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी, दुकानदार, शालेय विद्यार्थी आणि नागरिक करत आहेत.KK/ML/MS