निवडणुकींच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी
मुंबई, दि २४
सर्व राजकीय पक्षानी आपला मोर्चा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका वळवला आहे. याच निवडणुकींच्या अनुषंगाने आता जोरदार मोर्चे बांधणी केली जात असून दिवसरात्र बैठका आणि चर्चेच सत्र रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या (Mahayuti) गोटातून या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यात तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा रंगल्याची माहिती आहे. महायुतीची एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत चर्चा रंगलीय. त्यामुळे मुंबईसह राज्यातील जागावाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतिम निर्णय झाला असून आज तरी अधिकृत घोषणा होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.AG/ML/MS