आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती: ‘ट्रूपिक हेल्थ’च्या माध्यमातून भारतात पहिल्यांदाच ‘बायोलॉजिकल ब्लूप्रिंट’ तंत्रज्ञान लाँच
पुणे, दि २२: धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवयीन वर्ग विविध व्याधींच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि ‘रिस्टोरेटिव्ह हेल्थकेअर’ (पुनरुज्जीवन आरोग्य सेवा) क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ‘ट्रूपिक™ हेल्थ’ (Trupeak™ Health) सज्ज झाले आहे. आज पुण्यात एफसी रोड येथे या केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच ‘बायोलॉजिकल ब्लूप्रिंट’ बदलणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान याद्वारे सादर करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेलं व्यासपीठ
सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या आधारे दिले जाणारे सल्ले आणि ‘फॅड डाएट्स’ (Fads) यांना छेद देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन ट्रूपिक हेल्थची स्थापना केली आहे. डॉ. संजीव शशीधरन, डॉ. गौरव मिश्रा, डॉ. विक्रमादित्य साळवी, डॉ. अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र कार्यरत असेल. २० अनुभवी डॉक्टरांचा यात गुंतवणूकदार म्हणून सहभाग आहे.
भारतात पहिल्यांदाच ‘गोल्ड स्टँडर्ड’ तंत्रज्ञान
ट्रूपिक हेल्थ केवळ एक वेलनेस क्लिनिक नसून, ते विज्ञानावर आधारित उपचार केंद्र आहे. भारतात पहिल्यांदाच याद्वारे ‘इनडायरेक्ट कॅलरीमेट्री’ (Indirect Calorimetry) आणि ‘मसल साऊंड’ (MuscleSound™) ही दोन जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने आणली जात आहेत.
इनडायरेक्ट कॅलरीमेट्री: याद्वारे व्यक्तीच्या चयापचय (Metabolism) क्रियेचा अचूक अभ्यास केला जातो.
मसल साऊंड: शरीरातील स्नायूंमध्ये किती ग्लायकोजेन (ऊर्जा) आहे, याची मोजणी केली जाते.
या तंत्रज्ञानामुळे ओझेंपिक (Ozempic) किंवा वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून, स्नायूंचे आरोग्य राखून वजन कमी करणे शक्य होणार आहे.
‘सीईओ प्रोटोकॉल’ (CEO Protocol): अतिदक्ष व्यावसायिकांसाठी खास उपचार
मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, पोलीस दल, सशस्त्र दल (CRPF) आणि ज्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो, अशा लोकांसाठी ट्रूपिकने ‘सीईओ प्रोटोकॉल’ तयार केला आहे. यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, पीसीओडी (PCOD), हृदयाशी संबंधित समस्या आणि वंध्यत्वावर प्रभावी उपाययोजना केल्या जातात.
प्रमुख उद्दिष्ट: ‘फील गुड, लूक गुड, लिव्ह गुड’
ट्रूपिक हेल्थचे प्रवक्ते वरुण त्रिपाठी यांनी सांगितले की, “आमचे ध्येय केवळ आयुष्य वाढवणे नसून, आयुष्याचा दर्जा सुधारणे हा आहे. आम्ही व्यक्तीच्या जनुकीय रचनेचा (Genetic mapping) अभ्यास करून त्याला काय हवे आहे, हे ओळखून अचूक उपचार देतो. ‘फील गुड, लूक गुड आणि लिव्ह गुड’ ही आमची त्रिसूत्री आहे.”
विस्तार योजना
मुंबई नंतर आज पुण्यात दुसरे केंद्र सुरू करण्यात आले असून लवकरच दुबईमध्ये आणि त्यानंतर बंगळुरू, अहमदाबाद, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये १० नवी केंद्रे सुरू करण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, कर्करोग आणि किडनीच्या आजारांशी संबंधित काही उपचार विम्याच्या (Insurance) कक्षेतही येणार आहेत.KK/ML/MS