कोरड्या महाराष्ट्रात कालपासून पावसाची हजेरी , शेतकरी सुखावला
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठ दहा दिवसांपासून सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने कालपासून राज्यात हजेरी लावली आहे त्यामुळे दुबार पेरणी च्या संकटाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे .
काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला , अमरावती जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह सर्वत्र पाऊस पडला.गेल्या 10 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र रात्रीच्या पावसाने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे ,मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी मेघगर्जनेसह हजेरी लावली. नांदेड, किनवट, धर्माबाद, बिलोलीत हलक्या सरी तर, उमरी, मुदखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता ढेपाळे (55) यांचा तर किनवट तालुक्यातील शिवणी येथे शेतकरी गंगाधर अभया येवलवाड (55) यांचा समावेश आहे. तर उस्माननगर जवळील लाठी खुर्द येथील शंकर घोरबांड यांच्या आखड्यावरील दोन गायी वीज पडल्यामुळे मृत पावल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार होती, ती आज सकाळी ही सुरू होती , त्यामुळे पिकांना मोठा आधार झाला आहे.Heavy rains also lashed Thane and Palghar districts. Occasional showers fell in both the districts throughout the day.
ठाणे , पालघर जिल्ह्यातही कालपासून रिमझिम पाऊस पडला. आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी या दोन्ही जिल्ह्यात पडल्या .
नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला , नागपूर शहर आणि आसपास सकाळपासून जोरदार पाऊस पडला तर गडचिरोलीत काही गावांचा संपर्क तुटला इतका पाऊस पडला आहे .
Nagpur and Gadchiroli districts also received good rains, with heavy rains falling in and around Nagpur city since morning, while some villages in Gadchiroli have been out of connection
ML/KA/PGB
8 July 2021