प्रबोधनकार ठाकरे पुण्यतिथी.
मुंबई, दि. २०
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे धुरंधर नेतृत्व, अढळ विचारांचे समाजसुधारक आणि जनजागरणाच्या माध्यमातून समाजमन घडवणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दादर येथील पोर्तुगीज चर्च परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक शिवसेनेचे आमदार महेश सावंत, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.KK/ML/MS