नगराध्यक्षासह बहुमताने महायुतीचा विजय होईल समीर भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास
येवला, दि १७:- येवला नगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप व महायुती घटक पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. तसेच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना माजी खासदार समीर भुजबळ, भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भाजपनेते बंडू क्षीरसागर, पप्पू सस्कर, आनंद शिंदे, मनोज दिवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार येवला नगरपालिका निवडणूक ही महायुती घटक पक्षानी एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येवला नगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महायुती घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहे. त्यादृष्टीने आज महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून नगरपालिका निवडणुका ही महायुती घटक पक्ष एकत्र येऊन लढवत आहे. त्यानुसार चर्चा करून येवला नगरपालिका निवडणूकीत महायुतीघटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महायुतीच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे सांगत येवला नगरपालिकेत नगराध्यक्षासह सर्वच उमेदवार विजय होऊन महायुतीचा झेंडा फडकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या चर्चेनुसार येवला नगरपालिका निवडणुक महायुती घटक पक्ष एकत्र येऊन लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणत येवला नगरपालिकेवर महायुतीचा विजय होईल असे त्यांनी सांगितले.KK/ML/MS