काळाचौकी येथील श्रावण यशवंते चौक येथील बस स्टॉप झाला दारूचा अड्डा
मुंबई, दि ४
काळा चौकी येथील श्रावण यशवंते चौक या नाक्यावरील बस स्टॉप झाला दारूचा अड्डा झाला आहे. श्रावण यशवंतराव हा नाका पडत असल्याने या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणे वर्दळ असते. तसेच अनेक बेस्टचे प्रवासी या ठिकाणावरून बेस्ट क्रमांक 10, 45 आणि 49 ने दादर,महालक्ष्मी वडाळा, शिवडी, माजगाव या ठिकाणी जाण्यासाठी बस पकडत असतात. परंतु संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी या बेस्ट प्रवासांना या दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. हे दारुडे याच बस स्टॉप वर बसून रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन येथे मध्य प्राशन करत असतात. तसेच या बस स्टॉप च्या मागे चायनीज ची गाडी असल्याने त्यांना या बस स्टॉप वरच चायनीज लॉलीपॉप आणि चकना उपलब्ध होत असल्याने त्यांची फार मजा झालेली आहे. या बस स्टॉप वरती संध्याकाळी मोठ्या प्रमाणात काळात असतो हे काळोखाचा असं घेऊन दारुडे या ठिकाणी मौजमजा करत असतात. तरी या बस स्टॉप वरील दारुड्यांना त्वरित हटवावे अशी मागणी येथील बेस्ट प्रवासी, पादचारी आणि स्थानिक दुकानदार करत आहेत.KK/ML/MS