देशातील टॉप ७५ हृदयरोगतज्ज्ञांत डॉ. गजानन रत्नपारखी यांचा गौरव

 देशातील टॉप ७५ हृदयरोगतज्ज्ञांत डॉ. गजानन रत्नपारखी यांचा गौरव

मुंबई प्रतिनिधी : अंधेरी येथील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची देशातील टॉप ७५ हृदयरोगतज्ञांमध्ये निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत हील फाऊंडेशन इनिशिएटिव्हने हृदयरोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या देशातील शेकडो डॉक्टरांचा सर्व्हे केला. त्या टॉप ७५ डॉक्टरांमध्ये रत्नपारखी यांची निवड करून त्यांचा गौरव केला. डॉ. गजानन रत्नपारखी यांनी आजवर २५ हजारांहून अधिक हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचे ‘हसत खेळत हृदयविकार टाळा’ हे पुस्तक विक्रमी खपाचे ठरले आहे. तसेच त्यांच्या विविध सामाजिक आणि वैद्यकीय कार्याचा अहवाल आणि लेख विविध अंकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. रत्नपारखी सामाजिक कार्यातही अग्रेसर असून त्यांनी गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी शाळा दत्तक घेऊन शेकडो विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे विविध गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील ते नेहमी देत असतात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *