सायन येथील बंद प्रवेशद्वारामुळे रेल्वे प्रवासी हैराण

मुंबई, दि ९
सायन येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक दोन तीन चार वर दादर दिशेकडील प्रवेशद्वार बंद आहेत. सायन स्टेशनच्या बाहेर सायन ब्रिजचे काम सुरू असल्याकारणाने हे प्रवेशद्वार गेला अनेक महिन्यापासून बंद आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पूर्वेकडे रेल्वे प्रशासनाने एक नवीन प्रवेशद्वार उघडले आहे. याच प्रवेशद्वारातून रेल्वे प्रवाशांना बाहेर जावे लागते तसेच आज यावे लागते. परंतु हे प्रवेशद्वार कोणालाच कळत नाही कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक रेल्वे प्रशासनाने लावलेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ब्रिजच्या वर चढून पुन्हा खाली जाऊन पाठवू क्रमांकाचे दिशेने दिशादर्शक फलक नसल्याकारणाने बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना हा ब्रिज तज्ञ आणि उतरणे ही तारेवरती कसा करावी लागत आहे. तरी या ठिकाणी फ्लॅट क्रमांक एक दोन च्या वर रेल्वे प्रशासनाने त्वरित दिशादर्शक फलक लावावा जेणेकरून याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
मी माझे तान्या मुलासह प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उतरून ब्रिज चढून आले परंतु वरील प्रवेशद्वार बंद असल्याने मला पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर खाली उतरून बाहेर जावे लागले. त्यामुळे माझ्या हातात माझे लहान बाळ असल्याकारणाने माझी मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तरी या ठिकाणी थोडी दिशादर्शक फलक लावावा जेणेकरून माझ्यासारखा अनेकांना या ठिकाणी तारांबळ उडणार नाही अशी माहिती रेल्वे प्रवासी मोनिका सुखदेव यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या सायन या स्टेशनवर बाजूला वाहतूक पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणारा मध्य रेल्वेचा प्रवेशद्वार बंद आहे. परंतु आम्ही बाजूलाच दुसऱ्या प्रवेशद्वाराची व्यवस्था करून दिलेली असल्याकारणाने तसेच या ठिकाणी प्रवेशद्वार नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. तरी आम्ही व्यवस्थापनाला या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी दिशादर्शक फलक लागेल आणि प्रवाशांची गैरसोय थांबेल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.KK/ML/MS