भाजपा बेस्ट कामगार संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुनील गणाचार्य यांची सर्वानुमते निवड
मुंबई, दि ९: भाजपा बेस्ट कामगार संघाच्या
कार्यकारी अध्यक्षपदी सुनील गणाचार्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दादर येथे झालेल्या या सभेचे अध्यक्षस्थान गणेश हाके यांनी भूषवले होते. या बैठकीला संघाचे सर्व आगारातील अध्यक्ष, सरचिटणीस, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. 2016 ते 2021 या कालावधीतील कराराची थकबाकी, 2021-2026 या कालावधीतील नवीन कराराचा अभाव, गोठवलेले भत्ते, मेडिकल बिलांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक विषयांवर कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली
“आज बेस्ट उपक्रमात युनियनबाजी वाढली आहे. दर महिन्याला नवी युनियन तयार होते आणि फक्त नेतेगिरीसाठी स्पर्धा सुरू आहे. परंतु, खरी गरज आहे ती
कामगारांच्या हितासाठी संघटन शक्ती मजबूत करण्याची.”अशी माहिती बेस्ट कामगार संघाचे नवनिर्वाचित कार्य.कारी अध्यक्ष सुनील गणाचार्य यांनी दिली.
“जास्तीत जास्त सभासद वाढवून भाजप बेस्ट कामगार संघाला सर्व
आगारांमध्ये मजबूत करा. फसव्या वाद्यांपासून सावध राहा आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहा,” अशी माहिती बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके यांनी दिली
बेस्ट उपक्रमातील सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकून
“नवीन बसेस न आल्यास वीस हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. आज उपक्रमात युनियनपेक्षा कामगारांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. सर्व युनियननी एकत्र येऊन बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे मत सरचिटणीस गजानन नागे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. या प्रसंगी उपाध्यक्ष आनंद जरग, खजिनदार अनिल यादव, चिटणीस संतोष काटकर, उपाध्यक्ष सूर्यकांत हेगिष्टे, मुकेश इगवे, दीपक कोयंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. KK/ML/MS