७५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारच्या उज्ज्वला २.० योजनेला चांगलीच लोकप्रियचा लाभली आहे. आता केंद्र सरकारने देशातील ७५ लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.उज्ज्वला योजनेंतर्गत पुढील ३ वर्षांत महिलांना ही एलपीजी जोडणी मिळणार आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदाची बातमी मिळावल्यामुळे गृहीणींना दिलासा मिळाला आहे. देशातील गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 9.60 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत. पहिले रिफिल आणि शेगडी पण मोफत देण्यात येते. त्यासाठीचा खर्च ऑईल कंपन्या करतात.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिलेल्या माहिती त्यानुसार जगभरातील संस्थांनी केंद्रांच्या उज्ज्वला योजनेचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कॅबिनेट बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेमुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत झाली असून, महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.
मंत्रीमंडळाने आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या गॅस कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहेत. 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटींचा बोजा पडणार आहे. निवडणुकीचा हंगाम लवकरच सुरु होत आहे. चार राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ही सवलत देण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.दरम्यान या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
SL/KA/SL
13 Sept. 2023