फेम योजने अंतर्गत नागपूरात 40 इलेक्ट्रिक बसेस…
नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या फास्टर अडोप्शन अँड मनुफॅक्चरिंग हाईब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात फेम योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला संपूर्णपणे इलेक्ट्रिक 40 बसेस प्राप्त झाल्या आहेत .40 electric buses in Nagpur under FAME scheme…
यापैकी 22 बसेस चे परीचालनही सुरू करण्यात आले असून लवकरच उर्वरित बसेसची चालविण्यात येणार आहेत. सध्या नागपुर महापालिकेच्या हद्दीत सहा इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावत आहेत, आता 40 बसेस पुन्हा आल्यामुळे याची संख्या ही 46 वर गेलेली आहे .
2023 पर्यंत 144 बसेस येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे त्यामुळे 2023 च्या शेवटी नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत तब्बल 190 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना पाहायला मिळणार आहेत.
यामुळे नागपूर हे संपूर्णतः पर्यावरण पूरक होण्याच्या मार्गावर दिसत असून नागपूरातील परिवहन सेवा ही पूर्णतः इलेक्ट्रिक बसेस वर अवलंबून राहण्याचे पाहायला मिळत आहे .
याशिवाय चार्जिंग स्टेशनही उभारण्याचे कार्य नागपूरात केले जात आहे. केंद्र सरकारच्या मदतीने नागपूर महापालिकेने उचललेल्या या पावला संदर्भात नागपुरातील जनतेने आनंद व्यक्त केला असून केंद्र सरकारतर्फे दिलेल्या या बसेस अतिशय चांगल्या आणि दर्जेदार असून ही बसेस आरामदायी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
ML/KA/PGB
2 Dec .2022