PoK साठी जम्मू-काश्मीर विधानसभेत २४ जागा राखीव

 PoK साठी जम्मू-काश्मीर विधानसभेत २४ जागा राखीव

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकसभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे पीओके हे आमचेच आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव ठेवल्या आहेत. लोकसभेत “जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक” आणि “जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक” या दोन विधेयकांवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की,

“जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर काय झाले? असा प्रश्न जे लोक विचारत होते. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, मागच्या ७० वर्षांत ज्यांचा आवाज आजवर ऐकला गेला नाही. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन ५ आणि ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटविले. त्यानंतर आज आम्ही जम्मू-काश्मीरमधील विस्थापित नागरिकांना त्यांचे अधिकार देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत आज “जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक” आणि “जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक” या दोन विधेयकांमुळे त्या सर्वांना न्याय दिला जाणार आहे”,

SL/KA/SL

6 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *