नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ मृत्यू ; १२ बालकांचा समावेश

 नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ मृत्यू ; १२ बालकांचा समावेश

नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे . आणखी ७० रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना वेळेवर औषधी न मिळाल्यास त्यापैकी काहींचा जीव जाऊ शकतो.

गेल्या २४ तासांत जन्मलेली सहा बालके आणि ४८ तासांपूर्वी जन्मलेले सहा बालक अशा बारा जणांचा औषधी नसल्यामुळे मृत्यू झाला. याबरोबरच सर्पदंशामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचा हायर अँटीबायोटिक औषधी नसल्यामुळे मृत्यू झाला. तसेच हृदयविकारामुळे एकाचा आणि प्रसुती दरम्यान एका महिलेचाही मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरात नातलगांचा हंबरडा फोडला जात आहे .

नांदेड जिल्हा हा कर्नाटक तसेच तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यातील अनेक रुग्ण नांदेडलाच उपचारासाठी येत असतात, हे विशेष. ‘हाफकिन’ कडून औषधांचा पुरवठा न झाल्यामुळेच या रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात आले आहे. नांदेड मधील या घटनेमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणा हलली असून उद्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे पथक नांदेडला दाखल होत आहे.

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात ६०० खाटांची क्षमता आहे . परंतू या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते.नांदेडमधील तसेच परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल झालेले , अत्यवस्थ झालेले रुग्ण ऐन वेळेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले जातात. त्यामुळे त्यांना उपचार देत असताना जास्तीचा ताण डॉक्टरांवर तसेच रुग्णालय प्रशासनावर पडतो , असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी बदली झालेल्या अनेक डॉक्टरांच्या जागेवर इतर डॉक्टर रुजू न झाल्यामुळे डॉक्टरांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णालयात साडेचारशे डॉक्टरांचा ताफा असून ही डॉक्टर मंडळी वाढत्या रुग्णसंखेवर उपचार करण्यासाठी कमी पडत आहे. परंतु गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या २४ रुग्णांना औषधी न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. 24 deaths in government hospital of Nanded; Including 12 children

ML/KA/PGB
2 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *