सरकारची प्रेत यात्रा काढू
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बार्टीच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृ (BANRF2021) अंतर्गत सर्व पात्र 861 विध्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करण्यात यावी, या मागणीसाठी 12 एप्रिल रोजी आझाद मैदानात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वी जर सरकारने बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसकट (८६१) फेलोशिप आणि अवार्ड लेटर दिले नाही तर सरकारच्या निषेधार्थ राज्यभरातून सरकारची प्रेत यात्रा काढू असा इशारा
संशोधक विद्यार्थी आंदोलन समन्वयक समर्थन , सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधीछात्रवृत्ति (BANRF-2021) अंतर्गत सर्व पात्र 861 विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आजाद मैदान येथे 20 फेब्रुवारी पासून “बेमुदत धरणे आंदोलन” सुरू आहे .
गेल्या 50 दिवसापासून विद्यार्थी आझाद मैदानात आपले गाव, घर सोडून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे. या आंदोलकाना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आधापही भेट दिली नाही. मंत्रालयातील कुठलाही अधिकारी अजूनही विध्यार्थ्यांना भेटायला आलेले नसून या आंदोलनाची दखल सुद्धा घेतलेली नाही. या सरंजामी भूमिकेचा आम्ही सर्व सामाजिक, राजकीय संघटना, कर्मचारी संघटना या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत.असे भीम आर्मीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांनी सांगितले.
12 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्थानिक मंडळ, जयंती उत्सव कमिट्या तसेच सर्व समविचारी राजकीय पक्ष, स्थानिक मंडळ आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आजाद मैदानात धरणे आंदोलनात सहभागी होत असून बार्टीच्या या आंदोलनाला जाहीर पाठींबा देणार आहेत.
या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या, बेरोजगारांच्या प्रश्नांवर गंभीर नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे . आता हे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांना दुर्लक्ष करून सरकार राज्यात सावरकर गौरव यात्रा काढत आहे आमच्या त्याला शुभेच्छा आहे .
१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या पूर्वी जर सरकारने बार्टी च्या विद्यार्थ्यांना सरसकट (८६१) फेलोशिप आणि अवार्ड लेटर दिले नाहीतर याच्या निषेधार्थ राज्यभरातून सरकारची प्रेत यात्रा काढू
असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. आजच्या पत्रकार परिषदेला रिपाई (खोब्रागडे गट) मुंबई अध्यक्ष भागवत कांबळे, आर के गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष नामदेव साबळे,यांच्या सह 33 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 20,000 fine on Samriddhi Highway for these vehicles
ML/KA/PGB
8 Apr. 2023