काश्मिरमध्ये दोन वर्षांत २०० चित्रपटांचे शुटींग

 काश्मिरमध्ये दोन वर्षांत २०० चित्रपटांचे शुटींग

श्रीनगर,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्वदच्या दशकाच्या आधी अनेक चित्रपटांमधून आपल्याला काश्मिरचे सौंदर्य पाहता येत होते. परंतु त्यानंतर काश्मिर खोऱ्यात उफाळलेल्या भयंकर दहशतवादामुळे तेथे शुटिंग करणे अशक्य होऊन बसले होते. मात्र २०२१ मध्ये स्थापन झालेल्या जम्मू-काश्मीर फिल्म विकास परिषदेने (जेकेएफडीसी) हे शक्य करून दाखवले आहे. ही काश्मिरमधील शूटिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्सची व्यवस्था आहे. याद्वारे गेल्या २ वर्षांच्या काळात बॉलीवूडचे २०० चित्रपट, वेब सिरीज व अल्बमच्या शूटिंगला मंजुरी देण्यात आली. हा गेल्या ३४ वर्षांचा विक्रमी आकडा आहे.

राज्यातील परिस्थिती आता सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्यापैकी स्थिर झाल्यामुे बॉलीवूडसह दक्षिण भारतीय निर्मातेही येथे शूटिंग करण्यास प्राधान्य देवू लागले आहेत.

जम्मू-काश्मीरपैकी चित्रपटांची ९०% श्ूटिंग काश्मिरात होते. निर्माते आता काश्मीरच्या गुलमर्ग, पहलगाम, दल सरोवर आदी पारंपरिक स्थळांशिवाय बांदीपोरातील गुरेज व वुलर, दूधपथरी, योशमर्ग आदी नव्या डेस्टिनेशनमध्ये शूटिंग करण्यासही प्राधान्य देत आहेत.

यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच आणि त्याबरोबरच काश्मिरचे गेल्या काही दशकांपासून दहशतीमध्ये अवगुंठून राहीलेले स्वर्गिय निसर्ग सौंदर्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद सीनेरसिकांना मिळणार आहे.

SL/KA/SL

6 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *