प्रचंड चढउतारामुळे भांडवली बाजारात((Stock Market) २ % घसरण

 प्रचंड चढउतारामुळे भांडवली बाजारात((Stock Market) २ % घसरण

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

जितेश सावंत

जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर असतानाच अचानकपणे रशिया व युक्रेन युद्धाची सुरुवात झाली. एका आठवड्यात हे संपेल असे वाटत असताना युद्धाने दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला.जागतिकीकरणाच्या ह्या युगात ह्या युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे व त्याने जगात अस्थिरता पसरली आहे. अनेक देशात विजेचा व अन्नाचा (energy and food) तुटवडा जाणवायला लागला आहे.crude oil,natural gas,food,fertilizer,metals याची कमतरता जाणवायला लागला आहे. रशिया व युक्रेन हे देश महत्वाच्या वस्तूंचे(commodity) जगातील मोठे निर्यातदार आहेत. जर हे असेच सुरु राहिले तर जगासाठी हि एक मोठी धोक्याची घंटा ठरू शकेल. भारतासाठी क्रूड ऑईलच्या भावातील वाढ हि एकचिंतेची बाब आहे. भारतीय अर्थव्यवस्था त्यामुळे कोलमडू शकते. ह्या सगळ्यांबरोबर काही देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने अजून एक काळजीचे कारण निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे जगातील सगळ्या सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढविण्याशिवाय पर्याय नाही असे सूचित केले आहे. भारतात देखील येणाऱ्या काळात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

गेला आठवड्यात भारतीय बाजार प्रचंड चढउतार पाहावयास मिळाले. त्याची प्रमुख कारणे म्हणजे वाढती महागाई,आयटी कंपन्यांचे कमकुवत निकाल,कच्च्या तेलाच्या किमतीतील उसळी, रुपयाची घसरण, रशिया-युक्रेन युद्धाचे नवे वळण,यूएस फेड चेअरमन यांनी 50 bps व्याज दर वाढीचे दिलेले संकेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. डाऊ जोन्स ९८१ अंकांनी घसरला २०२० नंतर सगळ्यात मोठी एकदिवसीय घसरण.Dow plunges more than 900 points for its worst day since 2020
येणाऱ्या आठवड्यात बाजाराचे लक्ष मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल व मंथली एक्सपायरी याकडे असेल. तांत्रिकदृष्ट्या बाजार थोडा कमजोर आहे. निफ्टीसाठी १६,९००-१६८०० हे स्तर महत्वाचे ठरतील हे स्तर तोडल्यास बाजार अजून घसरण्याची शक्यता.

सलग चवथ्या दिवशी बाजारात घसरण.Market tanks for the fourth day
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहावयास मिळाली. आयटी कंपन्यांचे कमकुवत निकाल आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील उसळीमुळे होणाऱ्या महागाईच्या वाढीचा दबाव बाजारावर दिसून आला.कमकुवत जागतिक संकेत, वाढती महागाई आणि HDFC-Infy सारख्या दिग्गज कंपन्यांचे निराशाजनक परिणाम यामुळे बाजारात सलग चौथ्या दिवशी कमजोरी दिसून आली.संपूर्ण दिवस बाजारात कुठेही रिकवरी दिसली नाही.विस्तारित विकेंडचा देखील भारतीय बाजाराला लाभ झाला नाही. Infy मध्ये दोन वर्षातील सगळ्यात मोठी इंट्राडे घसरण पाहावयास मिळाली ९% पेक्षा जास्त घसरला. (Shares of Infosys plunged 9 percent). दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३०२ अंकांची घसरण होऊन १७,१७३चा बंददिला.
India’s inflation based on the Wholesale Price Index (WPI) rose to a four-month high of 14.55 percent in March from 13.11 percent in February

शेवटच्या तासातील गोंधळामुळे सेन्सेक्स ७०४ अंकांनी कोसळला. Last-hour mayhem sinks Sensex by 704 points
बाजराची पडझड मंगळवारी सलग पाचव्या दिवशी सुद्धा सुरूच राहिली. बाजारात सुरुवातीला तेजी होती परंतु शेवटच्या तासात दिवसाचा नफा पुसला गेला. शेवटच्या अर्ध्या तासात सेन्सेक्समध्ये -३२३ वरून -११३० अंकाची घसरण झाली. निफ्टीने १७,००० चा स्तर तोडला.रशिया-युक्रेन युद्धाचे नवे वळण तसेच मॉस्कोने त्याच्या पाश्चिमात्य शेजाऱ्यांविरुद्ध “लष्करी कारवाई” चा एक नवीन टप्पा सुरू केल्याचे म्हटल्याने चहुबाजूनी विक्री झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज मधील ३.८ टक्के वाढीने इंट्राडे तोटा काहीसा वसूल होण्यात मदत झाली. त्यामुळे बाजार शेवटी थोडासा रिकव्हर झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७०३ अंकांनी घसरून ५६,४६३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २१५ अंकांची घसरण होऊन १६,९५८चा बंददिला.

पाच दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी.
सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर बधवारी बाजारात तेजी पसरली. बाजार बाऊन्स बॅक करताना दिसला.जोरदार धुलाई झालेला HDFC व आय,टी सेक्टर मध्ये झालेली खरेदी या जोरावर बाजाराने बऱ्याच प्रमाणात रिकव्हरी दाखवली. भारतीय वित्तीय संस्थ्यांच्या खरेदीमुळे बाजार तरला.सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची तेजी झाली. बाजाराच्या वाढीस Reliance Industries मधील तेजी सुद्धा कारणीभूत ठरली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५७४ अंकांनी वधारून ५७,०३७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १७७ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १७,१३६चा बंददिला.

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी.
आशियाई बाजारातील सकारात्मक तेजीच्या जोरावर गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पहावयास मिळाली . आय.टी ,ऑटो,फार्मा या क्षेत्रातील खरेदीमुळे सेन्सेक्सने ९०० अंकांची बढत घेतली. सेन्सेक्स ८७४ अंकांनी वधारून ५७,९११ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २५६ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १७,३९२ चा बंददिला.

दोन दिवसांची तेजीची मालिका खंडित.Market snaps two-day gaining streak
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची दोन दिवसांची तेजीची मालिका खंडित झाली. दिवसाची सुरुवात गॅप डाउने झाली. बाजार उघडतानाच घसरला.सुरुवातीला बाजाराने थोडा सावरण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ ठरला.जागतिक बाजारातील कमजोरी व यूएस फेड चेअरमन यांनी मे मध्ये 50 bps व्याज दर वाढीचे संकेत दिल्याने बाजारात विकीचा मारा सुरु झाला.शेवटच्या तासाभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७१४ अंकांनी घसरून ५७,१९७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २२०अंकांची घसरण होऊन १७,१७२ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

23 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *