शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जमा
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर) : देशातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता आज जमा करण्यात आला आहे. ही एकूण रक्कम १६ हजार ८०० कोटी रूपये एवढी आहे. होळीचा सण तोंडावर आला असताना ही रक्कम जमा झाल्यामुळे देशातील शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात या निधीचे प्रतिकात्मक हस्तांतरण केले.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 12 वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला होता. तर, 11 वा हप्ता मे 2022 मध्ये देण्यात आला होता. पंतप्रधान किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी दोन हजार रूपये अशी एकूण सहा हजार रूपयांची मदत करते.
SL/KA/SL
27 Feb. 2023