या जलाशय परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र उभारणीसाठी १०१ कोटी रु मंजूर

 या जलाशय परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र उभारणीसाठी १०१ कोटी रु मंजूर

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील धरणक्षेत्र तसेच जलाशयामध्ये जल पर्यटन विकसित करून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने पुढाकार घेण्यात येतो. त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जल पर्यटन निर्माण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. नुकताच या संदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार गोसीखुर्द जलाशय परिसरात सदर प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे.

SL/KA/SL

11 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *