भूकंपाने नुकसान झालेल्या कुटुंबांना १० हजारांची मदत

 भूकंपाने नुकसान झालेल्या कुटुंबांना १० हजारांची मदत

शहापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भूकंपाचे सौम्य धक्के बसत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज सकाळी भेट दिली. तसेच नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला.

घराचे जास्त नुकसान झालेल्या १५ कुटुंबांना कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत प्रदान केली. तसेच ग्रामस्थांना चादर-ब्लॅंकेटचे वाटप करून, १५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट तातडीने देण्याचे जाहीर केले.

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यावरून परतल्यानंतर, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज सकाळी वेहळोलीला भेट दिली.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दशरथ तिवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर,भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड सर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.10,000 assistance to earthquake-damaged families

वेहळोली परिसरात जाणवणाऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू पालघर जिल्ह्यातील चारोटी नाका परिसरात आहे. या धक्क्याची तीव्रता २.५ रिश्टर स्केल एवढी असल्याचा अहवाल हैदराबाद येथील `एनजीआरआय’ संस्थेने दिला आहे. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) कडून मागविण्यात आली आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना धीर देण्याबरोबरच मदत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. This information was given by Union Minister of State Kapil Patil.

वेहळोली परिसरात नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या घराचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तंबू उभारण्यासाठी सुरक्षित जागा शोधावी, शाळा बंद ठेवून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तंबूत शाळा भरवावी, अशा सुचनाही केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रशासनाला केल्या.

सरकारी नियमानुसार १५ टक्के नुकसान झालेल्या घरांसंदर्भात मदत मिळेल. मात्र, त्याआधी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन कपिल पाटील फौंडेशनतर्फे १५ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली, अशी घोषणा कपिल पाटील यांनी केली. प्रत्येक कुटुंबाला चादरी-ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी काही महिलांनी किराणा सामान मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज सायंकाळपर्यंत १५० कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो साखर, तूरडाळ, गोडेतेल आणि एक किलो चहा पावडरचा समावेश असलेले कीट पोचविण्याचे आश्वासन दिले.

वेहळोली गावात भूकंपाच्या हादऱ्याने तडे गेलेल्या जयवंत बाबू देसले, रघुनाना आंबो देसले, हिराबाई बांगर यांच्या घरी जाऊन राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाहणी करून विचारपूस केली. त्यानंतर संपुर्ण गावात फिरून गावकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी वेहळोली ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गावकऱ्यांच्या अपेक्षांना लगेच होकार देऊन मदतीचा आधार दिला.

ML/KA/PGB
5 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *