सातारा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ध्वजारोहणाने उद्घाटन
सातारा दि १ : येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आले. देशभरातील मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावे असे मत डॉ. तारा भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केले .
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, स्वागत अध्यक्ष राज्याचे बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी देशभरातून आलेल्या साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.ML/ML/MS