संगमनेर येथे रंगणार शिक्षकांचा कराओके गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

 संगमनेर येथे रंगणार शिक्षकांचा कराओके गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंंडळ (रजि) आयोजित कराओके गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण, नासिक, मराठवाडा, पुणे, नागपूर, अमरावती या सहा विभागातील विभागीय स्तरावरील विजयी ४२ स्पर्धक शिक्षकांच्या या राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेत आपल्या गायनाचे कसाब दाखवणार आहेत.

संगमनेरच्या स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे (नाना) सहकारी पतसंस्था सभागृह, संगमनेर येथे २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी न्यायाधीश, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक तसेच कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे यजमान मंडळाचे नासिक विभाग अध्यक्ष प्रकाश पारखे यांनी स्पर्धकांना व पदाधिकारी यांना संगमनेर येथे स्पर्धेसाठी आमंत्रित केले आहे.

अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंंडळ हे शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी मंडळाचे संस्थापक-राज्याध्यक्ष नटराज मोरे यांनी तयार केलेले नॉन पॉलिटिकल साहित्यपीठ असून सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षक साहित्यिक, कलाकार,क्रीडापटूंचा समूह आहे.
मंडळाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा आहेत. येत्या काळात सात राज्यांसह संपूर्ण देशात विस्तार होणार आहे. मंडळामार्फत शिक्षकांसाठी मासिक काव्यलेखन, कथालेखन, काव्यगायन, कला व कलाविष्कार स्पर्धा दर महिन्याला घेण्यात येतात. या व्यतिरिक्त विशेष स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादी उपक्रम घेतले जातात.

मंडळाचे कल्याण,गोवा, कोल्हापूर, सांगली, माहूर तसेच महाराष्ट्र अनेक ठिकाणी संमेलने घेण्यात आली आहेत. दरवर्षी साहित्य, कला व क्रीडा या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, प्रत्येक जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

संविधान दिनाच्या दिवशी होणाऱ्या शिक्षकांच्या राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धेची सुरुवात, भारतीय राज्यघटना पूजनाने तसेच उद्देशिकेच्या वाचनाने होणार आहे या महाअंतिम गायन स्पर्धेचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता सर्व शिक्षक वृंदात व सर्व विभागात आहे.

मंडळाचे सचिव सौ.हर्षल साबळे व मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे यांनी उपस्थित रहावे यासाठी मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांना आवाहन केले आहे.

ML/KA/SL

22 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *