राज्याचे वाळू धोरण फसल्याचे मंत्र्यांनी केले मान्य
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाळूच्या सडलेल्या यंत्रणेमुळे शासनाने आखलेल्या नवीन वाळू धोरणाला अपेक्षित यश मिळालं नाही , त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे अशी कबुली महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आणि अप्रत्यक्षरित्या हे धोरण फसल्याची कबुली त्यांनी दिली .
वाळू शासनाकडून बंधमुक्त करून त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात ते द्यावे का यावर सभागृहाने सूचना द्याव्यात अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबतचा मूळ प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता, राजेश टोपे , बाळासाहेब थोरात , यशोमती ठाकूर, बबनराव लोणीकर आदींनी उप प्रश्न विचारले. वाळू ऐवजी क्रश sand वापरण्याचा सरकारचा आग्रह आहे असं ही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
ब्रँड ‘ महानंद ‘ च
राज्यातील महानंद दूध महासंघ ही संस्था NDDB ला चालवायला दिली असली तरी त्या दुधाचा ब्रँड महानंद हाच राहील आणि पुढील पाच वर्षांत संघाला ८३.८० कोटी इतक्या नफ्यात आणला जाईल असा हा करार असल्याची माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संबधित प्रश्नाच्या दिली. लहू कानडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या दूध संघातील यंत्रसामग्री शासनाच्या परवानगी शिवाय बदलता येणार नाही असं ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
ML/ML/SL
28 June 2023