यापुढे राज्यात मिळणार मोफत वैद्यकीय उपचार

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असून आज मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला याने यश आले आहे.
भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार याने मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital – नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहे.
सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
ML/KA/SL
3 Aug 2023