माजी आयपीएस अधिकाऱ्याची बिहार मध्ये नवी राजकीय इनिंग

नवी दिल्ली, 9 : बिहारचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या ‘हिंद सेना’ या राजकीय पक्षाची घोषणा केली. हा पक्ष मानवता, सामाजिक न्याय आणि सेवा यासारख्या मूल्यांवर आधारित असेल. मी माझ्या कामाची सुरुवात जय हिंद ने केली होती आणि आता त्याच उत्साहाने मी एक नवीन राजकीय सुरुवात करत आहे. हा पक्ष तरुणांसाठी आणि तरुणांच्या माध्यमातून स्थापन केला जाईल. प्रत्येक तरुणाला बदल हवा असतो, पण
प्रश्न असा आहे की हा बदल कोण आणणार? आम्हाला तरुणांसाठी एक माध्यम बनायचे आहे असे पक्ष स्थापनेच्या वेळी लांडे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांत त्यांनी बिहारमधील गावे आणि मागासलेल्या भागांचा सतत दौरा केला, जिथे त्या स्तरावरील वास्तवाने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यास प्रेरित केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही बिहारच्या अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचलेल्या
लांडे म्हणाले,मी पोलिसिंग केले आहे, म्हणून मला माहिती आहे की बिहारमध्ये दरवर्षी सुमारे २७०० ते ३००० खून होतात. यापैकी सुमारे ५७% खून जमिनीच्या वादातून होतात. म्हणजेच दरवर्षी १५०० हून अधिक लोक केवळ जमिनीच्या वादात मारले जातात. दररोज ४ ते ५ लोकांचा मृत्यू होतो. आता विचार करा, या परिस्थितीत सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल? अनेकांना वाटते की न्याय त्यांच्या खिशात आहे पण माझ्या पक्षाची न्याय ही संकल्पना फक्त त्यांच्यासाठी आहे जे खरोखरच गरीब, वंचित आणि पीडित आहेत, असे लांडे म्हणाले.