मंचरमध्ये दर्ग्याचे बांधकाम सुरु असताना आढळले भुयार

 मंचरमध्ये दर्ग्याचे बांधकाम सुरु असताना आढळले भुयार

मंचर, दि. १२ : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात एक वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे. चावडी चौकातील दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली आणि त्यातून भुयारासह हिंदू स्थापत्य सदृश बांधकाम दिसल्याने वातावरण तापलं. या घटनेची बातमी पसरल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करत तणाव शांत केला आहे. मात्र या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी व नक्की हे भुयार व त्यातील वास्तू काय आहे याचा अहवाल पुरातत्व खात्याने द्यावा तो आम्हाला मान्य राहील अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे.

मंचरच्या चावडी चौकात दर्ग्याच्या भिंतीचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. आतमध्ये भुयार आणि हिंदू स्थापत्य शैली असणारी कमान दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर हिंदू संघटनांनी दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला, तर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध नोंदवत इथे फक्त दर्गा आणि कबर असल्याचं सांगितलं. काल दुपारी दोन ते अडीच वाजता ही घटना घडली. कामगार भिंतीखाली काम करत असताना भिंत कोसळली. सुदैवाने कामगार बचावला, पण दर्ग्याचा मोठा दर्शनी भाग पडला. त्यावेळी हा भुयार सदृष्य भाग दिसुन आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *