दाट धुक्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत….
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. वातावरणातील दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी रब्बीतील पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र, पुन्हा दाट धुके पडून वातावरणात गारवा निर्माण होत असल्यानं हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत सापडले असून त्यांच्याकडून आता हरभरा पिकावर औषध फवारणी करण्यात येतेय.
ML/ML/PGB 17 Jan 2025