वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी राहणार खुले;
मुंबई, दि ३०
‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी, बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुस-या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे.
..
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱया दिवशी बंद ठेवण्यात येते.
..
सबब, या ठरावानुसार बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.KK/ML/MS