झोमॅटोच्या गुंतवणूकदारांना झाला मोठा फायदा
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांच्या घरोघरी पोहोचलेल्या झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर अचानक वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.सॉफ्टबँक व्हिजन फंड ही लंडनमधील कंपनी याला कारणीभूत ठरली आहे. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने झोमॅटो कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता हे शेअर या फायनेन्शिअल फर्मने विक्री केले आहे. यामुळे शेअर बाजारात, फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा शेअर वधारला आणि गुंतवणुकीचे मूल्य वाढून गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. SVF ग्लोबलने बुधवारी झोमॅटोचे 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. या शेअरची विक्री 94.7 रुपयांच्या ब्लॉक डीलच्या रुपाने करण्यात आली. त्यामुळे बाजारात 947 कोटी रुपयांचे शेअर आले. त्याचा फायदा झोमॅटोला झाला. झोमॅटोच्या शेअरमध्ये आतापर्यंत 54.8% वाढ झाली आहे.
मोठ्या प्रमाणात झोमॅटोचे शेअर बाजारात दाखल झाले. त्यामुळे कंपनीच्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग वाढले. बाजाराच्या पहिल्या सत्रातच झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. हा शेअर चढून 99 रुपयांवर पोहचला. आता गुरुवार आणि शुक्रवारी या शेअरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. त्यापाठोपाठ गुंतवणूक फर्म टायगर ग्लोबल मॅनेजमेंटने त्यांची पूर्ण 1.44 टक्के हिस्सेदारी विकली. हा वाटा बल्क डीलमध्ये विक्री करण्यात आली. हा सौदा जवळपास 1123 कोटी रुपयांचा झाला. त्यामुळे झोमॅटोचा शेअर झपाट्याने वधारला.
झोमॅटोने गेल्या वर्षी ग्रोसरी डिलिव्हरी फर्म ब्लिंकईटचे अधिग्रहण केले होते. या करारामुळे स्फॉटबँक व्हिजन फंडला झोमॅटोमध्ये एकूण 3.35 टक्क्यांची हिस्सेदारी मिळाली होती. या डीलनुसार, 25 ऑगस्टपर्यंत ही गुंतवणूक फर्म झोमॅटोच्या शेअर्सची विक्री करु शकत नव्हती. त्यामुळे ही डेडलाईन संपताच झोमॅटोने त्यांचा वाटा विकला. सॉफ्टबँकेने झोमॅटोतील 1.17 टक्के हिस्सेदारी विकली.
SL/KA/SL
30 Aug 2023