झोमॅटोचे CEO करत आहेत स्वतःच्या मेंदूचा अभ्यास
मुंबई, दि. 6 : Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या डोळ्याजवळ लावलेल्या एका छोट्या आकाराच्या चंदेरी रंगाच्या डिव्हाइसमुळे. याद्वारे ते स्वतःच्याच मेंदूचा अभ्यास करत आहेत. यांच्या कपाळावर दिसणाऱ्या डिव्हाइसचे नाव टेम्पल (Temple) असे आहे, जे एक एक्सपेरिमेंटल हेल्थ-टेक वेअरेबल आहे. रिअल टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाच्या प्रक्रियेची नोंद ठेवण्याचे काम हे डिव्हाइस करते. दीपिंदर गोयल यांनी डिसेंबर 2025 मध्ये याबाबतचे संकेत दिले होते. LinkedIn वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की हे डिव्हाइस त्यांच्या ‘ग्रॅव्हिटी एजिंग हायपोथेसिस’ ‘Gravity Ageing Hypothesis’ या रीसर्चशी संबंधित आहे. या संशोधनामध्ये वाढते वय, न्युरोलॉजी आणि गुरुत्वाकर्षण (Gravity) यांच्यातील नातं समजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
गोयल यांच्या मते, मेंदूतील रक्तप्रवाह हा वय, स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता (Cognition) यांचा एक महत्त्वाचा बायोमार्कर मानला जातो. Temple सारख्या डिव्हाइसद्वारे दैनंदिन जीवनात एकाग्रता, ताणतणाव, झोप आणि मानसिक थकवा याबाबत सखोल माहिती मिळू शकते. हे डिव्हाइस कधी लाँच करण्यात येणार आहे, त्याची किंमत किंवा रेग्युलेटरी मंजुरीशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामध्ये AI-आधारित डेटा विश्लेषण सुविधा उपलब्ध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SL/ML/SL