झोमॅटोकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

 झोमॅटोकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जेव्हा आपण एखाद्या संस्थेत काम करतो तेव्हा आपल्याला कर्मचारी म्हणून काही सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेणे हा आपला हक्क आहे. यामध्ये प्रसूती विमा योजना किंवा तत्सम योजनांचा समावेश असू शकतो, ज्या महिला कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. अलीकडेच एका प्रसिद्ध कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे.

कोणती कंपनी देतेय ?
ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोकडून त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना 25 ऑक्टोबरपासून एक खास भेट दिली गेली आहे. कंपनीसाठी काम करणाऱ्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सना या सुविधेचा लाभ घेता येईल. ही योजना आहे मातृत्त्व विमा योजना.

झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश रंजन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. रंजन यांनी स्पष्ट केले की या विमा योजनेचा सर्वात मोठा फायदा कामगारांना मिळेल आणि आम्ही त्यांचे हित लक्षात घेऊन कंपनीकडून अतिरिक्त सहाय्य देऊन त्यांना आर्थिक संरक्षण देण्याची आमची जबाबदारी पूर्ण करण्याचा विचार करत आहोत. शिवाय, त्यांनी नमूद केले की महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत दिली जाईल. Zomato presents Maternity Insurance Plan to women employees

सदर योजनेसाठी झोमॅटोकडून SKO या विमा प्रदाता संस्थेशी हातमिळवणी करण्यात आली असून, त्यांच्याकडूनच Maternity Insurance दिलं जाईल. ज्या डिलिव्हरी पार्टनर्सनी 1000 डिलिव्हरी पूर्ण केल्या आहेत आणि मातृत्त्व विमा योजनेच्या सूचनेच्या तारखेनुसार मागील 60 दिवसांपासून सक्रिय आहेत त्या या योजनेच्या फायद्यासाठी पात्र असतील. 

विम्याच्या माध्यमातून दोन मुलांपर्यंतची सामान्य आणि सिजेरियन डिलिव्हरी, गर्भपात अशा गोष्टींसाठी आर्थिक मदत केली जाईल. या योजनेतून प्रसूतीसाठी (Normal) 25000 रुपये, सिजेरियन सेक्शनसाठी 40000 रुपये आणि गर्भपातासारख्या घटना घडल्यास 40000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. 

ML/KA/PGB
26 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *