Zomato ची दोन दिवसात 52 हजार कोटींची कमाई

मुंबई, दि. २२ : देशात सर्वात मोठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोची परेंट कंपनी इटरनल ( Eternal ) शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून मोठी कमाई करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात कंपनी शेअरमध्ये २१ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या तिमाहीचे निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आश्चर्य म्हणजे ओव्हरऑल शेअर बाजारात दबावाचे वातावरण असताना हे घडले आहे.
आज शेअरबाजारात झोमॅटोची पेरेंट कंपनी इटरनलचे शेअरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. बीएसईच्या आकड्यांनुसार कंपनीचे शेअर उसळी मारत २९२ रुपयांवर खुले झाले. पाहाता पाहाता ३११.६० रुपयांसह दिवसाच्या उच्च पातळीवर पोहचले.खास बाब म्हणजे हा कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यातील सर्वाधिक भाव आहे. दुपारी २.२० वाजल्यावर कंपनीचा शेअर ११.३० टक्के वेगासह ३०१.८५ रुपयांवर कामकाज करीत होता. तसे पाहिले तर कंपनीचा शेअर कामकाजा दरम्यान २८९.९५ रुपयांच्या दिवसाच्या लोव्हर पातळीवरही गेला होता. एक दिवसांपूर्वी कंपनीचा शेअर २७१.२० रुपयांवर बंद झाला होता.
SL/ML/SL