झिम्मा -२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 झिम्मा -२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘झिम्मा’चा सिक्वेल येणार आहे. आज निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शन दिले की, “प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत… पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात… पण त्यासाठी REUNION महत्त्वाची! आणि आपली REUNION होणार २४ नोव्हेंबर पासून! भेटूया चित्रपटगृहात… (मागच्या खेपेसारखं…)”

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या लोकप्रिय कलाकारांची तगडीस्टार कास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.महत्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काही नवीन सदस्यही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित चित्रपटाचे निर्माते ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग असून चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे आहेत.

SL/KA/SL

19 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *