ठाण्यात झाडांची छाटणी केल्यामुळे ४५ पक्ष्यांचा मृत्यू

ठाणे. आज दिनांक १७/०७/२०२५ रोजी १७:५३ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- पक्षी मित्र श्री. रोहित मोहिते, मोबाईल क्रमांक:- +91 86577 69457) आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात बिल्डिंग नंबर ए७ समोर सोसायटीच्या आवारात खाजगी ठेकेदाराकडून झाडांची छाटणी केल्यामुळे अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले होते व झाडांच्या फांद्याखाली अडकून पडले होते.
सदर घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी (WWA), माय पाल क्लबचे कर्मचारी(MYPALCLUB), वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ पिकअप वाहनासह उपस्थित होते.
सदर घटनास्थळी अंदाजे गाय बगळा व बगळा प्रजातीचे ४५ पक्षांचा मृत्यू झाला आहे व पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये असलेली असंख्य अंडी देखील फुटली आहेत तसेच २८ जखमी पक्षांना झाडांच्या फांद्या खालून बाहेर काढून उपचारासाठी खाजगी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधीत विभागाला लवकरात लवकर कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.
_(तसेच, सदर तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात कळविणे.)_AG/ML/MS