ऐन सणासुदीच्या काळात वाशीम जिल्ह्यात झेंडू शेतीचे नुकसान…

वाशीम दि ३० : खरीप हंगामात पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात झेंडू फुलाला मोठी मागणी असते. यंदा प्रती किलो सुमारे ७० रुपये भाव मिळत असून, एकरी २४ क्विंटल उत्पादनानुसार जवळपास १.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती.
मात्र दसऱ्यापूर्वी झालेल्या अतिपावसामुळे वाशीम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील झेंडू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना थोडेफार फूल काढण्यास मिळाले असले तरी अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. सणासुदीच्या काळात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवून फुलशेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे फुलउत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.ML/ML/MS