जम्मू काश्मीर येथील झेड- मोर्ह(Zed Morh) बोगदा वाहतुकीसाठी खुला, पंतप्रधानांच्या हस्ते झाले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्गयेथील झेड- मोर्ह बोगद्याचे उद्घाटन केले. सीएम ओमर अब्दुल्ला आणि एलजी मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावेळी उपस्थित होते. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा बोगदा सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत खुला राहणार आहे. सोनमर्गच्या सर्व प्रसिद्ध पर्यटन रिसॉर्टशी कनेक्टिव्हिटीसह झेड- मोर्ह बोगदा वर्षभर काश्मीर आणि लडाखला जोडण्यास मदत करणार आहे. ६.४ किलोमीटर लांब द्वि-दिशात्मक असा हा बोगदा आहे. या बोगद्यामुळे या प्रदेशातील पर्यटन बदलण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे जम्मू– काश्मीरला आर्थिक फायदा होईल.