सौरव गांगुलीला Z श्रेणी सुरक्षा
कोलकाता, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने घेतला आहे. आधी गांगुलीला ‘Y’ श्रेणी सुरक्षा कवचाखाली तीन पोलिसांचे रक्षण होते. आता यात वाढ करून ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला Z श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांचा पहारा असेल.
बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुलीची सुरक्षा ‘झेड’ श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो बंगाल आणि भारताचा मुख्य खेळाडू आहे म्हणून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली”, अशी माहिती दिली आहे.
“गांगुली सध्या त्याची टीम दिल्ली कॅपिटल्ससह प्रवास करत आहे आणि २१ मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला ‘झेड’ श्रेणी सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले. गांगुलीने राज्य किंवा केंद्र सरकारकडे कोणतीही विनंती नव्हती, परंतु पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासकीय कार्यालयाने ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
SL/KA/SL
17 May 2023